मुरदाळा वाळूघाटावर नागरिकांनी केला ट्रक व टिप्पर जप्त

0
24

गोंदिया दि.७: तालुक्यातील मुरदाळा गावाजवळून वैनगंगानदीपात्रातील वाळूघाटावरुन विनापरवाना वाळू्चा होत असलेला उपसा थांबवून नागरिकांना होणारा त्रास वाचिवण्यासंदर्भात मुरदाळ्याचे माजी सरपंच परमानंद भाऊलाल उपवंशी यांनी 17 जानेवारील जिल्हा खनिकर्म यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.मात्र त्या तक्रारीकडे जिल्हा खनिर्कम अधिकारी फुलेकर यांनी डोळेझाक केली.त्यातच महसुलविभागाच्या अधिकार्यांनीही लक्ष न दिल्याने वाळूचा उपसा वाळुकंत्राटदारानी सुरुच ठेवला.दररोज 20 ट्रक्टर व 25 टिप्परच्या माध्यमातून सकाळपासून रात्रीपर्यंत होत असलेल्या वाहतुकीला कंटाळून आज बुधवारला मुरदाळा येथील वाळूघाटावरुन होत असलेला अवैध उपसा गावातील नागरिकांनी धाड टाकून थांबविला.लगेच महसूल व पोलिस विभागाला माहिती देत वाळूघाटावरून पोखलंड मशीन व ट्रक जप्त करुन त्याचा पंचनामा करण्यात आला.हा पंचनामा मंडळ अधिकारी डी.एच.पोरचेट्टीवार व तलाठी एन.एम.बुच्चे यांनी गावातील राजेश बिजेवार,अंगलाल कटरे व निरज उपवंशी यांच्यासह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत तयार केला.त्या पंचनाम्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भोपाल येथील शिवबंसल यांना हा घाट देण्यात आल्याचे नमूद करुन वेळ मारुन नेण्यात आल्याने प्रशासनच वाळूकंत्राटदाराच्या काळ्या व्यवसायाला मदत करीत असल्याने नागरिकांनी न्याय कुणाकडे मागावे अशा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला अनेकदा तक्रार देण्यात आली असली तरी तहसीलदारांनी याकडे लक्षच दिले नाही.त्यामुळे रात्री बेरात्री गावातून वाळूची वाहतूक करणारे ट्रक,टिप्पर बिनधास्त धावू लागले होते.शेवटी  हा त्रास सहन न झाल्याने गावकऱ्यांनी एकजूट होत आज बुधवारला नदी पात्रात जाऊन पोकलँड मशीन व एक ट्रक पकडले.