चारगावची ‘गंगोत्री’ बंगळूरुच्या “इस्त्रोत”; जिल्ह्यातील पहिलीच मुलगी

0
24
गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि ०८:– जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील चारगाव या छोटाश्या खेळ्यात जन्मलेल्या गंगोत्री नागपूरे या मुलीने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर इसरोमध्ये आपले स्थान पक्क केले आहे.इसरो या सशोंधन संस्थेत गोंदिया जिल्हयातून जाणारी गंगोत्री पहिलीच मुलगी ठरली आहे.अभियांत्रिकी(इलेक्ट्रानिक्स)च्या अंतिम वर्षाच्या एैन परिक्षेच्या दरम्यान आईला कँसर या रोगाने ग्रासले.सहा महिन्याचा तो काळ आई नागपूरच्या रुग्णालयात उपचार घेत असतानाच घरची मोठी मुलगी म्हणून आपल्या शिक्षणासोबतच घरच्या कामांतही लक्ष घालत परिक्षा दिली आणि त्या परिक्षेत विपरित परिस्थितीतही तिने २०१६ मध्ये यशसंपादन करणारी गंगोत्री मधुकर नागपूरे ही जिल्ह्यातील मुलीसांठी महिला दिनाच्या निमित्ताने आयकॉन ठरली आहे.
मधुकर नागपूरे यांचे सर्वसामान्य कुटुंब मधुकरची गंगोत्री मोठी मुलगी तिच्यासोबत ३ लहान बहिणी व १ भाऊ,आजोबा आजी व आई अशा सयुंक्त कुटुंब.गावात चांगल्या शिक्षणाची व्यवस्था नसल्याने गंगोत्रीच्या वडीलांनी तिला चारगावपासूनच अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या रावणवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केले.दररोज चार किलोमीटर पायदळ जाणे येणे करीत जिल्हापरिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर तिथेच गोंदिया शिक्षण संस्थेच्या जी.ई.एस.हायस्कुलमध्ये इयत्ता ८ वी ला प्रवेश केला.१० वी ची परिक्षा दिल्यानंतर त्याच शाळेत पहिल्याच वर्षी ११ वीची विज्ञान शाखा सुरु झाली.हायस्कुलच्याच शिक्षकांनी ११ व १२ वीचे वर्ग घेतले तिथून १२ वी उत्तीर्ण होऊन गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रानिक्समध्ये प्रवेश घेतला.पहिल्या वर्गापासूनच पास होण्याचा मार्ग स्विकारलेल्या गंगोत्रीने अभियांत्रीकीचा अभ्यासक्रमही पुर्ण केला.आणि २०१६ मध्ये पुण्यात खासगी क्लासेसकरीता रवाना झाली.त्याचदरम्यान इसरो बंगळुर येथील काही जागांसाठी जाहिरात निघाल्याचे वडिलांना कळताच त्या परिक्षेसाठी अर्ज केला.नागपूरच्या परिक्षा केंद्रावर परिक्षा दिली आणि त्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने गंगोत्रीची इसरोच्या पहिल्या टप्यातील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.आता गंगोत्री इसरोच्या पहिल्या प्रशिक्षणासाठी भोपाळला रवाना झाली असून यासोबतच तिने एमटेकचे स्वप्नमात्र कायम ठेवले असून त्यानंतर पीएचडी करण्याचा संकल्प सुध्दा व्यक्त केला आहे.
मनात ईच्छा शक्ती असली तर कुणीही काहीही करु शकते हे दाखवून देण्याचे धाडस गंगोत्रीने दाखविले आहे.गंगोत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला शिक्षणात कुठल्याही गोष्टीची अडचण आली नाही.घरची आर्थिक परिस्थितीत सबळ नसताना आजोबा शिक्षक राहिल्याने त्यांच्या पेंशनवर आणि शेतीच्या उत्पन्नावरच आमच्या सर्व बहिणभावांचे शिक्षण सुरु असल्याचे सांगत आमच्या शिक्षणामध्ये आजोबा-आजीचा मोठा पाठबळ असल्याचे आवर्जुन उल्लेख केला.आपल्या सर्व शिक्षणाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आपले आजोबाच असल्याचेही ती म्हणाली.
विशेष म्हणजे गावखेड्यात कितीही शिक्षित लोक असले तरी मुलींना काय शिकवायचे हा विचार आजही काही कमी झालेला नाही.तोच विचार शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गंगोत्रीच्या आजोबांचाही होता.कशाला मुलीला जास्त शिकवायचे राहू द्या नंतर बघू असे जेव्हा आपण म्हणाल्याचे गंगोत्रीचे आजोबा सांगायचे तेव्हाच त्यांनी मात्र आमच्या धर्मपत्नीने मात्र माझी नातीन शिकणारच तुमच्या पेंशनचा पैसा कुठे ठेवणार कुणासाठी खर्च करणार तो पैसा तिच्या शिक्षणावर खर्च करा आणि तिला जे व्हायचे होऊ द्या असे म्हटल्यानंतर आपणही मुलींच्या शिक्षणासाठी मग हवा तेवढा पैसा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे आल्याचे म्हणाले.गंगोत्रीच्या आईने आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलतांना लहानपणापासूनच अभ्यासाची सवय असायची त्यांच्यासोबतच मी पण पहाटे ४ वाजेच्या सुमारास उठायची आणि त्यांच्या अभ्यासात मदत करायची.परंतु २०१६मध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्यावेळीच जेव्हा मला कँसरने ग्रासले त्या काळात मांत्र गंगोत्रीची खरी परिक्षा ठरली आणि त्यात ती उत्तीर्ण झाल्याचा अभिमान असल्याचे सांगताना त्यांच्या चेहèयावर आनंद दिसून येत होता.वडिल मधुकर यांनी गंगोत्रीलाच नव्हे तर उर्वरीत  त्यांच्या ३ मुली व मुलाला सुद्दा उच्च शिक्षणाचा मंत्र दिला असून त्यांनीही इसरोसाराख्या संस्थेत जावे यासाठीच आपले प्रयत्न असल्याचे सांगतानाच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे सांगितले तोच मुलमंत्र आपणही आपल्या मुलीना दिल्यानेच त्यांना या क्षेत्रात यश मिळत असल्याचा उल्लेख केला.