महिलांनी व्यापक दृष्टीकोन स्वीकारावे – स्मिताताई गालफाडे

0
27
लाखनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलन
लाखनी,दि.08ः- मला चांगलं गात येते, चांगलं खेळता येते म्हणून यासर्वांचा उपयोग आपण समाजासाठी उपयोग केला पाहिजे. महिलांनी आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे. त्यासाठी आपला दृष्टिकोन व्यापक ठेवला पाहिजे. पूर्वी स्त्रियांना अनेक गोष्टी मध्ये अडथडे येत होती आजही येतात याचे कारण की स्त्री हीच स्त्रीची अडथळे बनत असते यापासून नेहमी स्वतःची सुरक्षा करावे असे विचार प्रसिद्ध उपक्रमशील शिक्षिका सौ स्मिता गालफाडे  यांनी व्यक्त केले.
त्या राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारे आयोजित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आज ८ मार्चला आयोजित महिला संमेलनात बोलत होत्या.उद्घाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रीती आळे, प्रमुख वक्ते सौ स्मिता गालफाडे आणि अध्यक्षस्थानी सौ डॉ अर्चना रणदिवे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सोनाली भांडारकर, माजी मुख्याध्यापिका सुनंदा देशपांडे, शाळा समितीच्या अध्यक्षा शीला भांडारकर उपस्थित होत्या.
या महिला दिनाच्या औचित्य साधून संस्थांतर्गत करू या स्वागत स्त्री जन्माचे या नाटिकेचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. तसेच संस्थांतर्गत संस्था उत्कृष्ट सेवा भूषण पुरस्कार पुरस्कार सौ संध्या हेमणे, सौ दिशा गद्रे, श्रीमती रमा नंदेश्वर, कु नीता कटकवार, सौ भूमिका नवखरे, सौ सुनीता फडणवीस, आशु राठोड, कु सोनाली सलामे, प्राची गिर्हेपुंजे, कु मृणाली शिवणकर यांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच गरीब पालक महिलांना सन्मानित करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रीती आळे यांनी महिलांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी कशी काळजी घ्यावी आणि मोबाईल पोलीस तसेच दामिनी पथकाला मदत कशी मागावी याबद्दल मार्गदर्शन केले.
स्त्रीयांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, जेवणात नियमितपणे केले नाही तर वाईट परिणाम होतात म्हणून नियमित योग्य वेळी जेवण करावे तसेच महिलांनी होणाऱ्या त्रासाबद्दल काय करायला पाहिजे याविषयी महिलांना उपयुक्त मार्गदर्शन डॉ सोनाली भांडारकर यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती सुनंदा देशपांडे यांनी राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाला ५० हजार रुपयांचा  देणगी धनादेश संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर आणि मुख्याध्यापिका सौ संध्या हेमणे यांना सुपूर्द केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका सौ संध्या हेमणे, संचालन विद्याताई सारवे, आभार दिशा गद्रे यांनी मानले.