राज्याचा अर्थसंकल्प सादर ,मातीकला मंडळाची घोषणा

0
35

मुंबई,दि.09-राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यास सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतले.वारकरी संपद्रायाचे थोर संत गोरोबा काका यांच्या नावाने माती कला मंडळाची स्थापना वर्धा येथे करण्याची घोषणा केली.या महामंडळाच्या माध्यमातून कला,पायाभूत सुविधा आदींना चालना देण्यात येणार असून यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे.गृहविभागासाठी 13 हजार 385 कोटी 3 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यात येणार्या अभ्यागत्यांसाठी अभ्यागत प्रणाली सुरु करण्यासाठी ई गवर्नस योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे जिवाश्म केंद्र उभारण्यास मंजूरी. महाराष्ट्र राज्य आटोचालक कल्याणकारी महामंडळा स्थापन करण्याचा मानस असल्याचेही मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे.

LIVE UPDATES :

– शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आलेत. ३६ महिन्यांत काम पूर्ण होईल. ३०० कोटींची तरतूद. शिवस्मारकाची निविदा अंतिम करण्यात आली आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद

-क्रांतीवीर उस्ताद लहुजी यांचे पुणे येथे स्मारक उभारणार

– मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत

– सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न

– सूत गिरण्यांना ३ रुपये प्रती युनिट वीज देण्याचे काम सरकार करेल

– ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद

– पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांना ८,२३३ कोटी रुपयांची तरतूद
– जलयुक्त शिवार याजनेसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद. गेल्या दोन वर्षांत ११ हजार गावं झाली स्वयंपूर्ण
– बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना विशेष सूट देणार
– सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद
– कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी 60 कोटींची भरीव तरतूद

– समुद्र किना-यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविणार.
– सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
– कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद

– नसो कुणाच्या चेहऱ्यावर दुःखाचा अंधार..मिळेल साऱ्यांच्या स्वप्नांना हक्काचा आधार…- मुनगंटीवार

अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या महत्त्वपूर्ण तरतुदी पुढीलप्रमाणे:

* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.
* सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
* सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद
* वनशेतीस प्राधान्य देण्यासाठी 15 कोटींची तरतूद
* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार
* कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद
* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार
* मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.
* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद
* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद
* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.
* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी
* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. त्यासाठी १६० कोटी एवढा निधी.

– राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलवर आणणार
– राज्यातील ६०९ एसटी बस स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी ४० कोटींची तरतूद. एसटीच्या माध्यमातून शेतमाल वाहून नेण्याची योजना विचाराधीन.

महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचेही या अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेची  मर्यादा 6 लाखावरुन वाढवून आठ लाखापर्यंत करण्यात आली आहे. स्कील इंडिया आणि कुशल महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रातील शैक्षणीक पातळी सुधारण्यासाठी आंतरराष्ट्री दर्जाच्या 100 शाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

शिक्षण आणि रोजगारासाठी याही तरतूदी करण्यात आल्या – 

  1. मानव विकास मिशनसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद.
  2. स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम
  3. जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र – 50 कोटी
  4. मानव विकास मिशनसाठी 350 कोटी
  5.  आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी..
  6.  विद्यार्थ्यांचं विद्यावेतन 4000 रुपयापर्यंत वाढवलं
  7. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद
  8. महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती – 4 कोटींची तरतूद
  9. महानुभाव पंथाचे आद्याप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र

एप्रिल २०१८ पासून समृद्धी महामार्गाचं काम सुरू होणार. भूसंपादनाची ६४ टक्के प्रक्रिया पूर्ण.

– महापुरुषांचं साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटींची तरतूद.

भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान एप्रिलपासून जलवाहतूक सुरु करणार

विदर्भ,मराठवाडा व प.महाराष्ट्रात 300 मेगावॅ्टचे विज प्रकल्प सुरु होत आहेत,तसेच विज प्रकल्पांना सवलत देण्यात येत आहे

न्यायालयीन इमारत व निवासस्थानासाठी 700 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

७००० किमी रस्त्यांसाठी २२५५ कोटी निधीची तरतूद

– ४५०९ किमीवरून ३ वर्षांत १५,४०४ किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले.

– रस्त्याच्या दुपदरीकरणाचे २६ हजार कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर.

– विद्यावेतन ४ हजार रुपयांपर्यंत वाढवलं.

  • दिव्यांगांना मोबाइल स्टॉल्स उभारून देण्यासाठी २५ कोटींची तरतूद
  • कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी २१ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेश्यालिटी हॉस्पिटल, २० कोटी रुपयांची तरतूद
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी १,५२६ कोटी रुपयाची तरतूद
  • गर्भवती गरीब महिलांसाठी ६५ कोटींची तरतूद

पर्यावरण-   यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचं उद्दीष्ट्य

    • वनसंरक्षण ५४ कोटी ६८ लाख निधी
    • पडीक जमिनीवरील वृक्षलागवडीसाठी – ४० कोटी
    • वनऔषधीसाठी-५कोटी

आदिवासी समाजाच्या पुनरुत्थानासाठी – ८९६९ कोटी ५ लाख

  • शामराव पेजे आदिवासी विकास महामंडळ – ११ कोटींची तरतूद
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्याच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद
  • न्यायालयाच्या इमारतींसाठी ७०० कोटींची तरतूद
  • गणपतीपुळे येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी 20 कोटींची तरतूद
  • विदर्भातील रामटेकच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद
  • सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाखांची तरतूद