मुख्य बातम्या:
काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा# #लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात# #ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार# #वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार# #पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा# #स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन# #कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे# #युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल# #ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी# #आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

डॉ.प्रभाकर लोंढे यांची आंतरराष्ट्रीय संघटनेवर सदस्य म्हणून निवड

नागपूर,दि.13ः-सामाजिक संशोधन, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी असलेल्या डॉ. प्रभाकर लोंढे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची नुकतीच संधी प्राप्त झाली आहे.
जागतिक संविधान आणि जागतिक संसद संघटनेमध्ये (world constitution and World parliament Association) सभासद म्हणून त्यांची निवड झाली आहे.
अमेरिकास्थित वाशिंग्टन येथे असलेल्या मुख्यालयातून त्यांना नुकतेच निवड पत्र प्राप्त झालेले आहेत.
अध्यक्ष डॉ. ग्लेन टी मार्टिन यांच्या मार्गदर्शनात पृथ्वी चे संघराज्य (Federation of Earth) स्थापित करण्याच्या दृष्टीने जागतिक संविधान व संसद (world constitution & Parliament) च्या संरचनेच्या दृष्टीने कार्य सुरू असून जगाचे संविधान असावे ही संकल्पना सर्वप्रथम इ.सन १९५८ मध्ये सार्वत्रिकरीत्या मांडण्यात आली होती. “वसुधैव कुटुंबकम” स्वरूपाच्या या संकल्पनेसाठी सर्वप्रथम पाउले अमेरिकेतून टाकण्यात आली. त्यादृष्टीने संघटनेच्या मुख्य समितीवर भारतातून डॉ. सुधीर तारे, प्रियरंजन त्रिवेदी हे सभासद असून उपसमितीवर डॉ. लोंढे यांची निवड झालेली आहे.
येत्या मे २०१८ मध्ये मलेशिया व सिंगापूर येथे होणाऱ्या वैश्विक सेमिनार मध्ये ते सहभागी होणार आहे. याशिवाय यानंतरचे सेमिनार भारतात ओ.पी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनिपत दिल्ली येथे डिसेंबर २०१८ मध्ये होणार असून “हुमन राईट्स अँड वर्ड पार्लियामेंट” हा मुख्य विषय असणार आहे..
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ. प्रभाकर लोंढे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण संधी मिळाली असल्याने त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. ते सध्या महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर सदस्य असून सोबतच मराठी विश्वकोश मंडळावर नोंद लेखक म्हणून सुद्धा मोलाचे काम करीत आहे. त्यांचे राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेली असून अशा प्रकारच्या मौलिक वैश्विक संधी मुळे त्यांच्या कार्याचा आलेख आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share