मुख्य बातम्या:
दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल# #राज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण# #प्रधानमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,राज्यघटना जाळल्याचा निषेध# #जुनी पेन्शन हक्क संघटन बनतय डीसीपीएस धारक कुटुंबीयांचा आधार# #सिमावर्ती प्रश्नाबाबत लवकरच खा.चव्हाण यांना आराखडा सादर करणार# #दुर्गामंदीर चप्राड (पहाडी) येथे दरोडा

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला

अमरावती,दि. १३: रमाई व पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभार्थी यांना महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी त्रास देत असल्याचा आटोप करीत आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यानी मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार यांची खुर्ची त्यांच्या दालनासमोरील उड्डाणपूलास टांगून वेगळ्याप्रकारचे आंदोलन केल्याने एकच खळबळ माजली आहे.
महापालिकेत प्रत्येक कामासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. एक घरकुलमागे 20 हजार रुपये मागीतले जात असल्याचे युवा स्वाभीमान संघटनेचे म्हणणे आहे. अनेकदा आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्याकडे याबाबत तक्रार करुन देखील त्यांनी कारवाई न केल्याने आज मंगळवारला संघटनेचे कार्यकर्ते दुपारी त्यांच्या दालनात धडकले.आयुक्त रजेवर असल्याने चक्क त्यांची खुर्ची दलनाबाहेर काढली. उपस्थित मनपा अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी विरोध दर्शविला. मात्र आंदोलकांनी विरोधनमोडीत काढून मनपा समोरून जाणाऱ्या उड्डाणपुलास खुर्चीला टांगले. यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्यात.वर्दळीच्या राजकमल चौक येथे झालेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर उड्डाणपुलास टांगलेली खुर्ची खाली उतरविण्यात आली. याप्रकरणी आंदोलकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Share