मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि.१३: वैद्यकीय रजा कालावधीतील वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडून अटक केली. डॉ.गोपाल प्रेमानंद पांढरे(३५), वैद्यकीय अधिकारी वर्ग ३(गट ‘ब’) असे जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ते हे जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते जानेवारी, फेब्रुवारी व मे २०१७ मध्ये वैद्यकीय रजेवर गेले होते. रजा कालावधीत त्यांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी रजा कालावधीत घेतलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सादर केली. परंतु तीन महिन्यांच्या वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्यास १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ८ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी डॉ.गोपाल पांढरे याने तक्रारकर्त्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावरुन एसीबीने डॉ.गोपाल पांढरे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३(१)(ड) व १३(२) अन्वये जिमलगट्टा उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील व पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, महेश कुकडकर, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, तुळशीदास नवघरे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

Share