मुख्य बातम्या:

मुरुमगाव-कोटझरी मार्गावर नक्षली बॅनर

धानोरा, दि.१४: – पोलिस मदत केंद्र मुरूमगाव अंतर्गत मुरूमगाव ते कटेझरी मार्गावर आज १४ मार्च रोजी नक्षली पत्रके व बॅनर आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत.पोलिस मदत केंद्र मुरूमगाव अंतर्गत मुरूमगाव ते कटेझरी या गावांना जोडणाºया मार्गावर आज नक्षल्यांनी बांधलेले बॅनर व पत्रके आढळून आली. त्यामुळे परिसारत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दुपारी याच परिसरात नक्षल्यांनी एकाची हत्या केली होती.

Share