वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

0
12

आकाश पडघन
वाशिम दि.१५:शिष्यवृत्ती व विविध प्रकारच्या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनांतर्गत  भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या आदेशाने पाठिंबा जाहिर करीत आज १५ मार्च रोजी जिल्हाधीकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.त्यावेळी भारिप बमसंचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष हाजी मो.युसूफ पुंजनी सेठ,जिल्हा महासचिव डॉ नरेश इंगळे,विजय मनवर, ऍड जझिर साहेब,नागसेन पट्टेबाहादूर भूषण मोरे,प्रा.सुभाष अंभोरे,राजीव दारोकर,यांच्या सह सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात शिष्यवृत्ती भष्ट्राचारातील गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावे.एस.सी. प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा २ लाखापासून ५ लाखापर्यंत वाढवावे.ओ.बी.सी. एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा १ लाखांपासून ५ लाखांपर्यंत करण्यात यावे.ईबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा ८ लाखांपासून १० लाखांपर्यन्त वाढवावी.निर्वाह भत्ता सरसकट दरमहा रु. १५०० ने वाढ करण्यात यावे. टाटा सामाजिक संशोधन संस्थे (TISS ) मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.