ही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी.. TDP

0
10

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.१६:- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्ज देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे खासदार थोटा नरसिम्हन यांनी दुजोरा देत म्हटले की, टीडीपी सरकारच्या विरोधात संसदेत एक वेगळा अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे. बीजेपी ही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी असल्याचे टीडीपीने म्हटले आहे. सोमवारी टीडीपी अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या तोंडावरच टीडीपीने हा निर्णय घेतला आहे. भाजपने विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने टीडीपीचे दोन मंत्री अशोक गजपती राजू आणि वायएस चौधरी यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. मात्र एनडीएसोबत राहणार असल्याचे पक्षाने म्हटले होते. पण शुक्रवारी अचानक टीडीपीने एनडीएचा पाठिंबा काढला.