१९ मार्चला अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन

0
36

यवतमाळ , दि. १६ :- साहेबराव शेषेराव करपे हे महागाव तालुक्यातील  चिलगव्हाण या गावचे सलग ११वर्ष गावाचे सरपंच पद भूषवणारे व युवा शेतकरी होते .त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनी वडिलांकडून  संगीताचे धडे घेतले होते उदरनिर्वाह साधन शेती, शेती परवडत नाही दरवर्षी तोटाच होतो घेतलेले कर्ज फेडता येत नाही,विद्युत बिलभरता येत नाही.हात उसने घेतलेले पैश्याची परतफेड करता येत नाही म्हणून अस्वस्थ होते.एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवणार आश्रमात गेले सविस्तर पत्र लिहिले रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.त्या शेतकरी स्मृतीस उजाळा देण्यासाठी महागाव येथे एकदिवसीय अन्नत्याग उपोषणास अचलपूरचे आमदार तथा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू,स्थानिक आ.राजेंद्र नजरधने. मा.आ.वामनराव चटप,नवनीत राणा(कौर),शेतकरी मार्गदर्शक प्रकाश पोहरे,राजश्री हेमंत पाटील, चंद्रकांत वानखेडे,माजी मंत्री वसंतरावजी पुरकेव शेकडो शेतकरी, उपस्थित राहणार आहेत.

सकाळी एका खोलीतून सहा शव काढावे लागले.साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे. असे नमूद केले होते.ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दुःखद कैफियत सांगणार होते.साहेबाराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरण ने बदला अन्यथा आत्महत्या रोज होतील असा इशारा दिला होता. हि पहिलीच आत्महत्या ती साहेबारावांची यांनी १९ मार्च १९८६ रोजी केली होती. या १९ मार्चला ३२ वर्ष पूर्ण होतात महणून १९ मार्चही तारीख निवडली आहे. शासनाला  गेल्या ३२ वर्षापसून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.हा उन्हाळा संपत संपत नाही शेतकारी हा ’राष्ट्रीय संपती ‘ समजून शासनाने उपाय-योजना करायला पाहिजे होती, ना त्या सरकारने केली ना हे सरकार करीत आहे,सरकार दखल घेत नाही,तेव्हा नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढते आपण काय करू शकतो ?अशा दुर्दैवी घटना आपल्या घरात घडली तर आपण अन्नाचा घास घेऊन शकू का ? “नाही”हेच उत्तर असेल तर एक दिवस अन्नत्याग करून शेतकऱ्यांन विषयी सहवेदना जीवंत असल्याची हि साक्ष राहणार आहे.एखादा व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा त्याचे मानसिक कारण असू शकते. पण एकाच व्यवसायातील लाख-लाख लोक जेव्हा आत्महत्या करतात.तेव्हा त्याचे मुळकारण मानसिकतेत नसते तर त्यामागील सामाजिक व मानसिक आर्थिक परिस्थिती याचे नेमके कारण काय असायला पाहिजे. शेती व्यवसाय तोट्याचे ठेवण्यात आला,दारिद्र्य वाढत गेले,पर्यायी अभाव राहिला, ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर या देशातील शासनकर्त्यांनी जाणिवपुर्वक शेतकरीविरोधी धोरणे राबविली,असा निष्कर्ष निघतो हि धोरणे राबविण्यासाठी त्यांनी काही कायदे निर्माण केले.शेतजमीन धोरण कायदा (सिलिंग),आवश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन  अधिग्रहण कायदे हे कायदे अस्त्र म्हणून वापरले.वरील कायदे कायम ठेऊन शेतकऱ्यांचे भले करता येत नाही .म्हणून ज्याला शेतकऱ्यांचे भले करायचे आहे त्यांनी या कायद्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे.
१९ मार्च ला होणाऱ्या ऐतिहासिक अन्नत्याग उपोषणाच्या पुर्व तयारी करण्यासाठी महागाव तालुका पत्रकार संघटनेची बैठक विश्रामगृहावर घेण्यात आली. या अन्नत्याग उपोषणाला सहवेदना व्यक्त व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे,व तसेच १९ मार्च हा दिवस ‘शेतकरी आत्महत्या दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा.यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले.