जवानाला ‘भगोडा’ म्हणणाऱया भाजप आमदारास हाकला…

0
9

धुळे,दि.16ः- पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भरतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांना भाजपा आमदार अनिल गोटे यांनी भगोडा म्हणून अपमान केला असून, भाजपा आमदार व खासदार यांच्यात चाललेल्या पत्रक युद्धात ज्याचा या पत्रक भानगडीत दुरान्वये संबंध नाही. भाजपा आमदार यांनी काढलेल्या पत्रकात भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांना उद्देशून भगोडा संबोधिले त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (शुक्रवार) सकल मराठा समाज व धुळे तालुक्यातील बोरविहीर ग्रामस्त यांच्या तर्फे भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ दहन करण्यात आले. त्यांचे निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली.

भाजपा आमदार अनिल गोटे हे स्वतः देशाची अर्थ व्यवस्थेचे लचके तोडणाऱ्या मुद्रांक घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी सोबतचा आरोपी असून, देशद्रोही व मोक्यातील आरोपी आहे. व जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीने भारतीय जवानाचा अपमान करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. आमदारचे खासदारांशी काय मत भेद आहेत ते त्यांनी त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवावे. भाजपा आमदार अनिल गोटे यांनी माफी मागावी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अनिल गोटेंचे निलंबन करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली व उपस्थित आंदोलकांनी भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी चंदू चव्हाण चे आजोबा चिंधा धोंडू पाटील, सकल मराठा समाजाचे मनोज मोरे, नाना कदम, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, संदीप सूर्यवंशी, रणजीत भोसले, संदीप चव्हाण, पंकज सोनावणे, रजनीश निंबाळकर संदीप शिंदे, संजय वाल्हे, किरण सोनावणे, समाधान करनकाळ, अरुण पवार, प्रफुल निकम, कृष्णकांत पाटील, हिरामण पाटील, दिनेश पाटील, विजय पाटील, परमेश्वर शिंदे, गोकुळ ढमढेरे, समाधान बागुल, योगेश पाटील, कुणाल पवार, ललित कोरके, सुनील भदाणे, राजू बोरसे, सनी भापकर, निलेश पाटील, अशोक पाटील, भूषण पाटील, मोनू देवरे, नाना कोळी, नितीन पाटील, महादू नागापुरे असंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते.