नांदेड पत्रकार संघाने केला प्रकाश कांबळे यांचा सत्कार

0
14

नांदेड.दि.17ः- मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न असलेल्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे सलागार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषद मंबईच्या कार्यकारी संदस्य पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे.शहरातील मिनीसह्याद्री सभागृह येथे गुरूवारी जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाकार्यकारिणी बेठक घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय सचिव विजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रकाश कांबळे यांच्या निवडीचे स्वागत करून अध्यक्ष नागापुरकर,मार्गदर्शक जोशी, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी सरचिटणीस सुभाष लोणे,कोषाध्यक्ष राजेश शिंदे,कृष्णा उमरीकर,रवींद्र संगनवार नरेश दंडवते, यांच्यासह त्रिरत्न भवरे, सौ.उज्वलाताई भवरे,लक्ष्मण भवरे, बाळासाहेब पांडे,किशन भोयर,आजम बेग,दीपक बार्‍हाळीकर,राजेंद्र कांबळे, यासीन बेग,तुकाराम सावंत,अनिल धमने,पी.जी.गिलचे,धोंडिबा बोरगावे,प्रविण खंदारे, सचिन डोंगळीकर,हर्ष कुंडलवाडीकर,जयराम वन्ने,यांच्या सह कमलाकर बिराजदार, पवार,माधव मेकेवाड यांच्या सह पत्रकार,छायाचित्रकार पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार,यांनी कांबळे यांचा भव्य सत्कार केला.