दिल्लीच्या कृषी उन्नती मेळाव्यात जैविक यौगिक शास्वत शेती स्टॉलला प्रतिसाद

0
17

गोंदिया,दि.१७ः- राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या मेळाव्यात विशेष आकर्षण ठरले आहे ते जैविक यौगिक शास्वत शेती कशापध्दतीने करावी यावर लावण्यात आलेले कृषी स्टॉल.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जैविक यौगिक शास्वत शेती या स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेणार आहेत.हा प्रोजेक्ट ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास प्रभागाच्यावतीने तयार करण्यात आले असून रासायनिक खतापासून कसे दुष्परिणाम होतात हे या स्टॉलमधील प्रयोगातून गोंदियाचे प्रगतशिल जैविक योगिक शास्वत शेतकरी व ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी महेंद्र ठाकूर हे भेट देणाèयांना समजावून सांगत आहेत.
त्यात गडचिरोलीतील शेतकèयांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, न्यू पुसा, दिल्ली येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे.