राजपत्रित अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेत निदर्शने

0
9

भंडारा : सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाचा जागा राखीव ठेवण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटनेच्यावतीने शुक्रवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणाचा पुर्वीप्रमाणे ५० टक्के कोटा देण्यात यावा, यापुर्वीही असा कोटा देण्यात येत होता. त्यामुळे विविध रुग्णालयात रुग्णांना सेवा देण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हायचे. भारतीय आर्युविद्यान परिषद नियमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५० टक्के पदव्युत्तर पदविका देण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय पुर्वीप्रमाणे करण्यात यावा, अशी मागणी आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्यात यावी या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.
यावेळी जिल्हा परिषदेत मधुकर कुंभरे, डॉ. राकेश नंदेश्वर, डॉ. विकास मेश्राम, डॉ. शंकर कैकाडे, डॉ. सविता मालडोंगरे, डॉ. ज्योती कुकडे, डॉ. नरेंद्र नौकरकर, डॉ. ताराचंद येळणे, डॉ. मेहबूब कुरैशी यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते.