वडधम वनपरिक्षेत्रांतर्गत २ लाख १६ हजारांचे सागवान जप्त

0
11

गडचिरोली,दि.१९(अशोक दुर्गम):- अवैधरित्या सागवानाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, वनाधिकाºयांनी सापळा रचून २ लाख १६ हजारांचा सागवान जप्त केल्याची घटना आज १९ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास वडधम वनपरिक्षेत्रांतर्गत दुब्बापल्ली खंड क्रमांक २६५ मध्ये घडली. या कारवाईत ६ बैल व ३ बैलगाड्यासुध्दा जप्त करण्यात आल्या.प्राप्त माहितीनुसार वडधम वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया दुब्बापल्ली जंगलात सागवान झाडांची कत्तर करून बैलगाडीव्दारे सागवानाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वनाधिकाºयांना मिळाली. त्यानुसार वनाधिकाºयांनी आज पहाटे दुब्बापल्ली जंगल परिसरात सापळा रचला. दरम्यान सागवान तस्कर बैलगाडीच्या मदतीने सागवान लठ्ठ्यांची तस्करी करताना आढळून आले. वनाधिकाºयांची भनक लागताच सागवान तस्कर अंधाराचा फायदा घेवून जंगलात फरार झाले.
या कारवाईत २ लाख १६ हजार रूपये किंमतीच्या सागवान लठ्ठ्यांसोबत ६ बैल व ३ बैलगाड्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी नरखेडकर, वनपाल श्रीकांत नवघरे, शेख कादीर शेख, वनरक्षक ओकसा, भुरसे, कोडाप, वनमजूर रवी बुरावार, श्रीपाल येलपुला यांच्यासह वनकर्मचाºयांनी केली.