शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित!

0
23

गडचिरोली,दि.20 – प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणार्या शासकीय आमश्रशाळेत शालेय आहाराबाबत विद्यार्थी व पालकांच्या आलेल्या तक्रारींच्या आधारावर नुकतेच रूजू झालेले प्रकल्प अधिकारी यांनी गडचिरोली प्रकल्पातील तीन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

नुकतेच रूजू झालेले प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्पातील अनेक आश्रमशाळांना भेट दिली. या भेटीमध्ये आलेल्या निर्देशाप्रमाणे प्रकल्पातील आश्रमशाळेत चौकशीचे आदेश प्रकल्पाधिकाºयांनी दिले. या आदेशाप्रमाणे चौकशी केली असता,अनेक आश्रमशाळेतील शालेय आहारात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. अशा आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकावर प्रकल्प अधिकाºयांनी कारवाई केली. अनेक आश्रमशाळेतील गैरव्यवहाराचा अहवाल प्राप्त झाला आहे. अशा मुख्याध्यापक व अधीक्षकांवर कारवाई करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. मात्र आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक विद्यार्थ्यांना योग्यरित्या पोषण आहार देत नसल्याच्या तक्रारी पालक व विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. नुकतेच रामगड आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाला निकृष्ट दर्जाचे भोजन दिल्याबाबत चाप दिल्याची चर्चा आहे.
शासकीय आश्रमशाळेत वाटप केल्या जाणाºया केळी, अंडे, सफरचंद, अन्नधान्याची खरेदी स्थानिक स्तरावरून करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. मात्र स्थानिक स्तरावरून ही खरेदी न करता जिल्हा मुख्यालयातील एकाच दुकानातून ही खरेदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नेमके कुणाच्या सांगण्यावरून मुख्याध्यापकांनी जिल्हा मुख्यालयातून आहाराची खरेदी करून आर्थिक व्यवहार केला आहे, याबाबतची चौकशीदेखील सुरू असल्याची माहिती आहे.