ब्रह्मपुरी वनविभागात आढळला मृत बिबट

0
13
filephoto

ब्रह्मपुरी,दि.21ः- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातर्गंत येत असलेल्या शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिटअंतर्गत एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास उघडकीस आली. या बिबटचा वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. त्याच्या डोळ््यावर व पायांवर गंभीर जखमा आहेत. त्याचे वय अंदाजे ३ वर्षांचे असून त्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी वनपाल दोडके, वनरक्षक नवघडे, कुडमठे, आमोद गौरकर व त्यांची चमू उपस्थित होती.