कनिष्ट लेखाधिकारी पटले लाच घेतांना अटक

0
11

सालेकसा,दि.२२ गोंदिया जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात्रगत कार्यरत सालेकसा पंतायत समितीचे कनिष्ट लेखाधिकारी बी.डी.पटले यांना आज सालेकसा येथे २००० हजाराची लाच घेतांना सापळा रचून अटक करण्यात आल्याची घटना घडली.सविस्तर असे की सालेकसा पंचायत समिती येथील सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी यांनी 2011-12 मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मंजुरीने 46 हजार रुपयाचे किरकोळ साहित्य खरेदी केले होते.त्यावेळी अनुदान नसल्याने त्या बिलाचे देयके दुकानदारास देण्यासाठी  तक्रारदार सहाय्यक लेखाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता.त्या देयकायचे प्रलबिंत बिल काढण्यासाठी पाठपुरावा केला.त्यानंतर कनिष्ट लेखाधिकारी पटले यांची भेट घेतली असता त्यांनी स्टॅम्पपेपरवर अटी शर्ती लिहून बिल काढून देतो असे सांगितले.त्यासठी 4 हजाराची मागणी केली.मुळात तक्रारदारास रक्कम द्यायची इच्छा नसल्याने गोंदिया लाचलुचपतप्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आधारे आज 22 मार्च रोजी सापळा रचून कार्यालयात पहिली खेप म्हणून 2 हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गोंदियाच्या पथकाने केली