मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

जहाल माओवादी अरविंदकुमारचा मृत्यू

गडचिरोली,दि.22ः-माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि केंद्रीय समितीसह सेंट्रल मिलिटरी कमांडचा सदस्य असलेल्या अरविंदकुमारचा बुधवारी सकाळी १० वाजता झारखंड-ओडिशा सीमेवर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दंडकारण्यासह ओडिशा, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या अरविंदवर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते.
जहाल माओवादी अरविंद याने १९६७च्या काळात माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या माध्यमातून काम सुरू केले. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल भागात संघटनेला मजबूत केले. २००४मध्ये माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि पीपल्स वॉर ग्रुप या दोन नक्षलवादी संघटनांचे एकत्रीकरणासाठीच्या चर्चेतही त्याची महत्वपूर्ण भूमिका होती. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर भाकपा माओवादी संघटनेत त्याला केंद्रीय समितीचा सदस्य बनविण्यात आले. गंगन्ना या अतिजहाल माओवादी नेत्याच्या नेतृत्वातील सेंट्रल मिलिटरी कमांड बड्या घटनांचे नियोजन, सुरक्षा दलांवर हल्ले करीत असते. अरविंदनेही अनेक बड्या घटनांमध्ये सहभाग नोंदविला होता. ६२ वर्षे वय झाल्याने मागील वर्षभरात त्याची प्रकृती ढासळली होती. यातच त्याचा मृत्यू झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

Share