मुख्य बातम्या:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे# #महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८# #डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार# #एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते# #अकोला एमआयडीसीत अग्नितांडव# #भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी# #युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत# #कमलनाथ को मध्य प्रदेश कांग्रेस की कमान, सिंधिया चुनाव कैंपेन कमेटी के चेयरमैन# #दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन# #माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

बाजार लिलावपध्दतीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन

गोंदिया,दि.22ः-नगरपरिषदेच्यावतीने येथील भाजीबाजारातील वसुली करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या ईनिविदा पध्दतीतील ठेका प्रकियेला काँग्रेससह चिल्लर भाजी विक्रेतासंघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनीही विरोध केला आहे.नगरपरिषदेने ठेकापध्दतीसाठी काढलेल्या ईनिविदेवर आक्षेप नोदंवित याप्रकियेच्या विरोधात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पाटील यांनी काँग्रेसचे पक्ष नेते व बांधकाम सभापती शकील मंसुरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.निवेदनात ज्या पध्दतीने ठेका पध्दतीचा आग्रह नगरपरिषदेने घेतला आहे,त्यामुळे बाजारपरिसरातच नव्हे तर शहरात एकप्रकारे अराजकता वाढण्याची शक्यता असून छोट्याभाजी विक्रेत्याकंडून दादागिरीच्यास्वरुपात अवाढव्य रक्कम वसुल करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.निवेदन देतेवेळी काॅगेसचे वरिष्ठ नेता राकेश ठाकुर,नगरसेवक क्रांती जायसवाल,नगरसेवक सुनील भालेराव,नगरसेवक भागवत मेश्राम,नगरसेवक सुनील तिवारी,देवा रूसे,मंटू पुरोहित,स्विकृत नगरसेवक पराग अग्रवाल,नगरसेविका निर्मला मिश्रा,नगरसेविका दीपिका रुसे,नगरसेविका श्वेता मंटु पूरोहीत,नगरसेविका शिलू राकेश ठाकुर उपस्थित होते.

Share