मुख्य बातम्या:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे# #महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८# #डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार# #एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते# #अकोला एमआयडीसीत अग्नितांडव# #भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी# #युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत# #कमलनाथ को मध्य प्रदेश कांग्रेस की कमान, सिंधिया चुनाव कैंपेन कमेटी के चेयरमैन# #दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन# #माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

राका ग्रामपंचायतीला शाैचालय बांधकामाचा मुहूर्त सापडला

सडक अर्जुनी ,दि.22ः- तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुठल्याही कामासाठी प्रमाणपत्र हवे असेल तर ग्रामपंचायतीतून त्याला आधी आपल्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जाेडावे लागते.तेव्हा कुठे त्या व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळतो.परंतु जर सामान्य व्यक्तीला शौचालय असल्याचे प्रमाणपत्र देणार्या ग्रामपंचायतीकडेच शौचालय नसेल तर काय म्हणावे अशा प्रकार घडला आहे.तो म्हणते तालुक्यातील निर्मलग्रामपंचायत असलेल्या राका गावात.या ग्रामपंचायतीने निर्मलग्राम पुरस्कार पटकावला.मात्र ग्रामपंचायतीच्या आवाराच सार्वजनिक शौचालय नसल्याने विविध कामासाठी येणार्या नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली होती.यासंबधीचा वृत्त अनेक प्रसारमाध्यमानी प्रकाशित केल्यानंतर कुठे ग्रामपंचायतीला जाग आली.आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 1 लक्ष रुपये खर्चाचे शौचालय बांधकामासाठी प्रकिया सुरवात करण्यात आल्याने ग्रामपंचायतीला शौचालय बांधकामाचे मुहूर्त सापडले आहे.विशेष म्हणजे आठ ते 10 दहामहिन्यापुर्वीच खड्डा खोदण्यात आला होता,आता बांधकामाला मुहुर्त मिळाला आहे.

Share