चंद्रपुरला जाणारी रेल्वे 23 ते 26 मार्चला मूल पर्यंतच धावणार ..

0
14

गोंदिया,दि.22 ः- गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावरील वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7:15 ला चंद्रपूर जाणारी रेल्वेगाडी 23 मार्च ते 26 मार्च पर्यन्त मूल(मारोडा) रेलवे स्टेशन पर्यंत धावणार असून चंद्रपूरवरुन गोंदियाला जाणारी सकाळची गाडी ही  10:58 वाजता मूल येथून सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.या चार दिवसात चंद्रपूर ते मूल रेल्वेमार्गावर मेगा ब्लाक घेण्यात आल्याने प्रवाशांनी नोंद घ्यावे असे आवाहन केले आहे.मूल ते चंद्रपुर स्टेशनपर्यन्त विद्युतीकरणाचे काम शिल्लक असल्याने रेल्वे प्रशासनाने 23 ते 26 मार्च या चार दिवसात चार तासाचा मेगाब्लॉक ठेवल्याने सकाळी वडसा येथुन चंद्रपूरसाठी बनणारी ट्रेन क्र. 58808 ही फक्त मूल पर्यन्तच जाणार आहे.सकाळी चंद्रपूरहुन येणारी गाड़ी क्र. 58805 ही मूल येथूनच सकाळी 10:58 ला धावणार आहे. हा ब्लॉक चार तासाचा सकाळी 7:20 वाजता पासून 11:20 वाजेपर्यन्त राहणार आहे.