अधिकार्यांची बेंबदशाही, हिलटॉप गार्डनचा पाणी पुरवठा बंद

0
21

गोंदिया दि. २३ :- – आज शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध पर्यटन संकुलाला उतरती कळा आली होती. मात्र स्थानिक युवकांनी संघटित होत नवेगावबांध फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यटन संकुलाचा अल्प कालावधीतच कायापालट केला. या मधील हिलटॉप गार्डन हे सुद्धा त्यापैकी एक, आत्ता तर श्रमदानातून फुलविलेल्या बागेवरच येथील स्थानिक प्रशासनाची वक्रदृष्टी पडली असून बागेतील झाडांना होणारा पाणीपुरवठा वन विभागातर्फे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बागेतील अनेक झाडे अधिकार्याच्या बेबंदशाहीमूळे नष्ट होण्याचा मार्गावर आहेत.गेल्या आठवड्यापासून हा विषय सुरु असतांना प्रसारमाध्यमांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केलेले असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना मात्र अद्यापही या बागेशी काहीच सोयरसुतक नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.

प्रशासनाच्या निष्कळजीपणामुळे कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेल्या हिलटॉप गार्डनच्या विकासाचा विडा नवेगावबांध फाऊंडेशनने उचलला. आकर्षक बगिचा तयार झाला मात्र हे वन्यजीव व वनविभागाल बघवले गेले नाही. त्यांनी या गार्डनला शासकीय खर्चाने पाणी पुरवठ्यापोटी होणाऱ्या वीज खर्चाची मागणी करुन पाणी पुरवठाच बंद केला. पाणी पुरवठ्याअभावी गार्डनवर संकट ओढवले आहे. प्रशासन व नवेगावबांध फाऊंडेशनच्या या कलगीतुºयात ग्रामपंचायतनेही उडी घेतल्याने हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती १२ नोव्हेंबर १९७५ रोजी झाली. नवेगावचा परिसर वनस्पती सृष्टी, वन्यजीव सृष्टी व पक्षीसृष्टी यांनी समृद्ध व बहरलेला होता. १९७५ ते १९९० च्या काळात उद्यानाची भरभराट झाली. उदयानापेक्षाही उद्यानाच्या संकुल परिसरातील विकसित बगीच्या, लहान मुलांची खेळणी, निसर्गरम्य तलाव, संजय कुटी, हिलटॉप गार्डन हे पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावत होते. मात्र हळूहळू यावर अवकळा आली. मनोहर गार्डन व हिलटॉप गार्डन हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतय होते. ते नेस्तनाबूत झाले आहेत.
‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी म्हण आपण कित्येकदा ऐकली असेल तर कित्येकदा हे ब्रीदवाक्य वन विभाग सुद्धा वापरात असते. मात्र असे असले तरीही वन विभागाच्या ब्रीदवाक्याला तडे देण्याचे काम सध्याचा घडीला खुद्द वन विभागाचे अधिकारी देत असल्याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध पर्यटन संकुलात पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी सुरुवातीचा काळात वन विभाग तसेच वन विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक कामे झाली; मात्र फक्त ती कागदावरच. त्यामुळे या परिसराला उतरती कळा येते काय? अशी येथील स्थानिक युवकांचा मनात शंका निर्माण झाली होती. त्यामुळे येथील स्थानिक युवकांनी संघटित होत या ठिकाणी नवेगावबांध फाउंडेशनची स्थापना करीत या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळाचा विकास श्रमदान तसेच लोकसहभागातून घडवून आणला होता. या ठिकाणी असलेले हिलटॉप गार्डन हा सुद्धा त्यातील एक अविभाज्य भाग होता.

या ठिकाणचा विद्युत मिटर व पाणीपुरवठा मिटर वनपरीक्षेत्राधिकारी (स्वागत) यांचे नावे आहे. माहे सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ३३ हजार १०० रुपयाचे विज देयक आले. या गार्डनसाठी फाऊंडेशनने पाणीवापर केला. यासाठी पाणी पुरवठ्याचा अर्धा अधिकार १६ हजार ५५० रुपये नवेगावबांध फाऊंडेशनने त्वरित भरणा करावा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असे पत्र नवेगावबांध राष्टÑीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (स्वागत) यांनी फाऊंडेशनला दिले आहे. या पत्रामुळे विकासासाठी झपाटलेल्या नवेगावबांध फाऊंडेशनच्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.