आमगावात पार पडले इंटकचे शिबिर

0
6

गोंदिया,दि.२४ : विदर्भ राष्ट्रीय ईलेक्ट्रीकल वर्कर्स यूनियन इंटकचे विज क्षेत्र बचाव चिंतन शिबीर व कार्यशाळा आमगाव येथे पार पडले.शिबिराचे उद्घाटन श्याम वंजारी (झोनल अध्यक्ष )यांच्या हस्ते ,गणेश रावते (उपाध्यक्ष )यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी  दिगंबर कटरे (केन्द्रीय सचिव ) ,विश्वजीत मेंढे (केन्द्रीय सदस्य ), अजय दरभे (भंडारा जिल्हा सचिव )पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी विजक्षेत्र बचाव आंदोलनाची गरज का पडली यावर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच विज महावितरण कंपनीच्या फ्रेन्चायशीसंबधी प्रशासन व शासनाने घेतलेल्या निर्णयासंबधी सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी पाहुण्यांनी कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रशासनाला पत्र देत प्रत्यक्ष भेटून निकाली काढण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.आयोजनासाठी प्रविण भागवत, निलेश बारेवार,विजय वऱ्हाडे,चंद्रभान झिंगरे यानी सहकार्य केले. सूत्रसंचालन निलेश बारेवार यांनी तर आभार सुरेश सदावर्ते यांनी मानले.