शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांची साताèयात राज्य रॅलीचे आयोजन

0
19
गोंदिया,दि.२६-शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना गोंदिया जिल्हा शाखेच्या त्रैमासिक सभेत विविध विषयावर चर्चा करुन माजी सैनिकांच्या हक्क अधिकारासाठी तसेच शासकीय कार्यालयामध्ये सन्मानपुर्वक व्यवहार व्हावे यावर भर देण्यात आले.सभेला शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संगठना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रशेखर आलेगांवकर,अजय चव्हाण,चिटणिस संतोष मलेवार,पारखदास पटले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांचे राज्यस्तरीय अधिवेशन व रॅली सातारा येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.तसेच या रॅलीला सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये माजी सैनिकासोबत सन्मानपुर्वक व्यवहार करण्यात यावे.तसेच न करणाèयावर शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची मागणी सभेत करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात पुनर्नियुक्त असलेल्या सैनिकांनी संघटनेला बळकट करण्यासाठी आर्थिक सहयोग करावे तसेच आजिवन सदस्य व्हावे असे आवाहन करण्यात आले.यासाठी प्रभाकर पुस्तोड़े, अध्यक्ष, मो.९४०४२१८१६८,टेकराम बिसेन उपाध्यक्ष, मो.९४०४८६०७७३, ९४०४१५२१७६,गिरिधारी सोनवाने सचिव, मो. ९४०४००३६५१,रमेश राहंगडाले सहसचिव,मो.८५५१८६१३२५ व नाभिकमल चौधरी कोषाध्यक्ष,मो.९४०४३१८५०५ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या बैठकीत जुनी पेंशन लागू करणे,सैनिकी सेवा जेष्ठता लागू करणे,वर्ग १ व २ मध्ये माजी सैनिकांना आरक्षण देणे,पीएसआय,एसटीई व अस्टि.या पदावर पुर्वीसारखे १५ टक्के आरक्षण देणे,माजी सैनिकांच्या मुलांना निशुल्क शिक्षण देण्यात यावे.माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक संस्थामध्ये दिलेले आरक्षण तत्काल प्रभावाने लागू करण्यात यावे.विरपत्नींना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात यावे.क्रिमीलेयरची मर्यादा उत्पन्न मर्यादेत करणे आदी मागण्यावर बैठकित चर्चा करण्यात आली.