सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा- माजी खासदार नाना पटोले

0
8
उंदीर मार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला देशविदेशात नुकसान
चारा घोट्याळापेक्षाही उंदीर मार घोटाळा
गोंदिया,दि.२६ः-गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील qपडकेपार येथील एका शेतकèयाने मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याने त्यांच्याविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबधी माजी खासदार नाना पटोले यांनी देवरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याविरुद्द गुन्हा न नोंदविता मुख्यमंत्री पोलीस महानिरिक्षकांच्या माध्यमातून आपल्याविरुध्दच मुख्यमंत्र्याची बदनामी केल्याचे कारण पुढे करुन गुन्हा नोंदविण्यासाठी स्थानिक पोलीसांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.जर आपल्याविरुध्द गुन्हाच दाखल करावयाचा असल्यास देशद्रोहाच्या कलम १५३ अंन्वये नोंदवावा अन्यथा एनसी दाखल केले तर आपण तपासअधिकारी पासून पोलीस महानिरिक्षकापंर्यत सर्वांना न्यायालयात ओढू  असे सांगितले.ते गोंदिया येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा महासचिव व माजी सभापती पी.जी.कटरे,अमर वराडे,पृथ्वीपालसिंह गुलाटी,डेमेंद्र रहागंडाले,प्रकाश रहमतकर,विशाल शेंडे,मनिष मेश्राम,व्यंकट पाथरू आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोबतच महाराष्ट्राच्या मंत्रालयात घडलेल्या उंदीर मार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेचे देशविदेशात सर्वात मोठे नुकसान झाले असून चारा घोटाळ्यापेक्षाही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रालयात झालेला हा घोटाळा असल्याचे म्हणाले.पटोले पुढे म्हणाले की,आपण मुख्यमंत्र्याविरुध्द नोंदविलेल्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी न करताच उलट पोलीस महानिरिक्षकांनी आपल्यालाच फसविण्यासाठी स्थानिक पोलीसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार तपासी अधिकारी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी आपल्या गावी येऊन याप्रकरणात आपली चौकशी केली होती.त्यानंतर आपल्याविरुध्द एनसी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.त्यावर आपण पोलीस अधिक्षकांना भेटून आपल्याविरुध्द सरकारविरोधात आवाज उठविल्याबद्दल कलम १५३ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करता एनसी केल्यास आपण तपासअधिकारीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याविरुध्द न्यायालयात जाणार असल्याचेही सांगितले.एकीकडे दोंडाईच्या नगराध्यक्षाविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागते.तर याठिकाणी मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर शेतकèयाने आत्महत्या केली असल्याने त्यांच्याविरुध्द का गुन्हा दाखल होऊ नये असेही पटोले म्हणाले.
मंत्रालयात मारले गेलेल्या ३ लाख उंदराबाबत बोलतांना म्हणाले की हा गैरव्यवहार भाजपचे जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांनीच उघडकीस आणला आहे.जेव्हापासून नवे मंत्रालया तयार झाले तेव्हापासून हे सरकार त्यामध्ये बसले असल्याने हे उंदीर कुठून आले आणि त्यांना मारण्यासाठी त्या कंपनीला काम देण्यात आले त्याचीच चौकशी व्हायला हवी.या उंदीरमार घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची देशविदेशात बदनामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने फडणवीस यांचा हा घोटाळा चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे म्हणाले.तसेच भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकसदर्भात बोलतांना निवडणुकीसंदर्भात न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही.ज्या युवकाने ही याचिका न्यायालयात टाकली त्यासाठी वकील केला.त्या वकीलाची फीस एका पेशीची सुमारे २ लाख रुपये असल्याने त्या युवकाला पैसे कुणी दिले याचाही तपास व्हावा qकवा त्या युवकाची खरीच आर्थिक क्षमता आहे का या गोष्टीचीही तपासणी होणे आवश्यक झाले असून कुठेतरी अशा गोष्टीवंर आळा घालण्याची गरज असल्याचेही म्हणाले.