भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही; मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट

0
9

मुंबईः,दि.27(विशेष प्रतिनिधीः- कोरेगाव-भीमा प्रकरणी संभाजी भिडे यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिडे गुरुजींना क्लीन चिट दिली. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेनं केली होती. ती पोलिसांनी नोंदवून घेतली आणि कारवाई सुरू केली. त्यानंतर आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आलेत, त्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग होता, हे स्पष्ट होत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नावर विरोधकांच्या वतीने नियम 293 अन्वये दाखल स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.

त्या तक्रारदार महिलेने इन कॅमेरा सांगितले आहे की, आपण भिडेंना पाहिले नाही. मात्र ही दंगल त्यांनी घडवल्याची चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकली आहे. तरिही राज्य सरकारने तपास सुरूच ठेवला आहे. ही घटना गंभीर आहे. या घटनेला कोणीही जबाबदार असो त्याला सोडले जाणार नाही. यात माझ्या घरचे सामील असले तरी मी त्यांना सोडणार नाही. ही घटना महाराष्ट्राला कलंक आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. कोणालाही सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ग्वाही सभागृहाला दिली.