गोंदियात तिहेरी तलाकविरोधात निघाला मुस्लीम महिलांचा मोर्चा

0
6

गोंदिया,दि.२७- संसदेत मंजूर केलेल्या तिहेरी तलाकला गोंदियातील मुस्लीम महिलांनी आज कब्रस्तान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शविला आहे.या मोर्चात तब्बल हजारावर हजार मुस्लीम महिलांनी सहभाग घेतला होता.तिहेरी तलाकविरोधी कायदा मंजूर करून केंद्र सरकारने मुस्लीम महिलांना दिलासा दिला. मात्र २०१७ साली मंजूर झालेल्या तिहेरी कायद्याला आता मुस्लीम समाजातील विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे.हातात फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेचे रुपांतर झाले.त्यानंतर तिहेरी तलाकविरोधातील निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देतेवेळी अफसाना जावेद शेख,सायरा जुनेद शेख,रेहाना सैय्यद अफसर अली,सानिया मुजीब खान,शहनाज इदरिस शेख,आशिया सैयद जाकीर,शमापरवीन शेख,रुबिना शेख,मुमताज शेख,समीम कमरअली,राबीया शेख,जैबुन बीबीजी व रिजवाना हैयात खान यांचा समावेश होता.