निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शसत्रक्रिया शिबिराला प्रतिसाद  

0
18
सडक अर्जुनी,(बबलू मारवाडे),दि.२८:-तालुक्यातील सौन्दड़ येथे महात्मे आय बँक,नागपूर,जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया व डाॅ.अश्विनी अशोक लंजे यांच्या संयुक्तवतीने आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व तिरडे नेत्र शस्त्रक्रिया शिबिराला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत तपासणी करुन घेतली.हे शिबिर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले माळी समाज सभागृह सौन्दड़ येथे डाॅ.अश्विनी अशोक लंजे यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात 540 नागरिकांनी सहभाग घेतला.त्यापैकी 300 रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर 1 आणि 3 एप्रिलला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.शिबिराला माजी जि.प.सभापती अशोक लंजे,सौन्दड़ ग्रामपंचायत उप सरपंच सुनील राऊत,तंटामुक्ती समिती अध्यक्ष चरंण शहारे, ग्रामपंचायत सदस्य हर्षकुमार मोदी,टीकाराम चुटे,माजी उपसरपंच राकेश रहिले, विनोद कावळे, संजय भैसारे यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते.