साकोली-वडसा मार्गावर पोलीसाच्या डायरीत होते अवैध एंट्रीशुल्काची नोंद

0
8

भंडारा,दि.29 : भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात एका वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर गाडी उभी करून ये जा करणाऱ्या वाहनचालकांकडून खंडणी वसुली करण्याचा व्हिडीओ समोर आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये सदर पोलीस कर्मचारी वाहतुक नियमांची सर्रास पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत असून खंडणी स्वरुपात एंट्रीशुल्क घेतले जात आहे.ही वसुली दोन जिल्ह्याच्या सीमेवर किंवा तालुक्यांच्या सीमेवर उभे राहून सर्वत्रच केली जाते.ते लाखांदूर येथील या व्हीडीओने मात्र उघड केल्याने पोलीस वसुलीसाठी काय काय करतात हे समोर आले आहे.

संबधित मार्गावर नियमित चालणाऱ्या वाहनांनकडून महिन्याची फी एंट्री म्हणून आकारली जाते, त्यांना कुठल्याही नियमांशी काही देणे घेणे नाही.एंट्री फी भरा कुणी अडवले तर सांगा आणि मोकळे व्हा अशा प्रकार साकोली-वडसा मार्गावर उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे दर महिन्याच्या एक तारखेला या वाहतूक पोलिसाकडे एन्ट्री शुल्क देऊन त्या पोलीसाकडे असलेल्या डायरीत त्याची नोंद करावी लागत असल्याचे त्या व्हिडीओ मध्ये दिसून येत असल्याची चर्चा आहे.