पालकमंत्र्याच्या हस्ते अपंगाना साहित्याचे वितरण

0
6

अर्जुनी मोरगाव,दि.30ः- तालुक्यातील ग्रामपंचायत बोरटोला अंतर्गत येत असलेल्या इंजोरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत 3 टक्के अंपग विकास योजनेतून गावातील अपंग व्यक्तिंना साहित्याचे वितरण गुुरुवारला करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर,माजी आमदार हेमंत पटले,बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर,गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार यांच्यासह सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.