पटोलेंच्या उपस्थितीत असंतुष्ठांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
9

गोरेगाव,दि.02:- येथील सारजा लाॅन येथे आयोजित गोरेगाव तालुका कॉग्रेस कमेटी बुथ समन्वयक व कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात भाजपसह इतर पक्षातील असंतुष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष एँड.के.आर.शेंडे,खरेदी विक्रीचे सभापती डाॅ. झामसिंग बघेले,नगराध्यक्ष सीमा कटरे,गोरेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले, डॉ नामदेव किरसान,माजी सभापती पी.जी.कटरे, सि टी चौधरी,जगदिश येरोला, राजेंद्र राठोड, मलेशाम येरोला,अमर वराडे,नगरपरिषद उपाध्यक्ष आशिष बारेवार,ए़ड.पी.सी.चव्हाण,जितेंद्र कटरे,राहुल कटरे, रत्नदिप दहीवले, अल्का काठेवार, ललिता बहेकार,ओमप्रकाश कटरे, सुरेश चन्ने,विशाल शेंडे,रुपेंद्र दिहारी आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष झाल्याबद्दल माजी खासदार नाना पटोले यांचा आधी सत्कार करण्यात आला.यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे सुधीर येडे, प्रदिप शहारे, जनार्धन नंदेश्वर, भिमराव कोल्हे, शिवकुमार रहांगडाले, उमराव मेौदेकर, जयचंद पटले, महेंद्र लांजेवार, सदाशिव कटरे यांचा नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुथ कमेटी तयार करणे, निकामी, खोटारड्या सरकार विरोधात मतदारापर्यत माहीती पोहचविणे, राज्यातील मंत्रालयातील उंदीर घोटाळा, शेतकरी कर्ज माफी योजना ही फसवेगिरी, शेतक-यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यास मज्जाव आणणे, केंद्रातील सरकार ही अडाणी, अंबाणी असुन ललित मोदी, निरव मोदी यांनी घोटाळा करुन परदेशात पाठविणारी सरकार असल्याची माहीती सामान्य जनतेपर्यत पोहचविण्याचा संकल्प या मेळाव्यात घेण्यात आला.संचालन डेमेंद्र रहांगडाले व आभार प्रदर्शन सिमा कटरे यांनी मानले.तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.