अ.भा.आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने डाॅ.पाणतावणे व प्रा.कडूंना श्रध्दांजली

0
7

गोंदिया,दि.02– अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेतर्फे डॉ. गंगाधर पानतावणे व प्रा.जेमिनी कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रध्दांजली सभेचे अध्यक्ष कवी युवराज गंगाराम होते. यावेळी अँड्. राजकुमार बार्बोडे, प्रा. गुरुदास झांबरे, डॉ. सी.टी. राहुले,अंकुश मेश्राम, सी.झेड्.गजभिये,भिमराव वासनिक,प्रभाकर गजभिये,सतिश बन्सोड, मधू बन्सोड,माणिक गेडाम,बापू ईलमकर,एस.आर.लाडे यांनी डॉ.गंगाधर पानतावणे व प्रा.जेमिनी कडू यांच्या साहित्य व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून श्रद्धांजली अर्पण केली.
सभेचे प्रास्ताविक व संचालन संसदेचे सरचिटणीस प्रा. ज्योतिक ढाले यांनी केले.