आ.रहागंडालेंच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

0
16

तिरोडा,दि.02ः- तिरोडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामातंर्गत धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत लघु कालवा बांधकाम, वितरिका लघु कालवा बांधकाम, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील तसेच कवलेवाडा वितरीकेच्या बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार भजनदासजी वैद्य, कृ. ऊ. बा. स.तिरोडाचे सभापती डाँ. चिंतामण रहांगडाले,उपसभापती विजय डिंकवार,जि.प.सदस्य मनोज डोंगरे,प. स.सदस्य डाँ. बी. एस. रहांगडाले,पवन पटले, कृ. ऊ. बा. स.संचालक पिंटूभाऊ रहांगडाले, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, सरपंच किरण पारधी, गुलाब कटरे,दीपक गिरेपुंजे,भरत बिसेन व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.