गोेरेगाव तालुक्यात पाण्याचे ३४४ रासायनिक नमुने दुषित

0
13
गोरेगाव,दि.03ः- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्र कवलेवाडा, चोपा, सोनी, कुèहाडी, तिल्ली अंतर्गत ५५ ग्रामपंचायत येतात यात १०७ गावांचा समावेश असुन पिण्याचे पाणी स्त्रोत एक हजार ६९८ आहेत. तसेच नळ योजना, इनवेल असे साधन आहेत पाणी पिणे योग्य आहे किंवा नाही या स्त्रोताची तपासणी उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा गोरेगाव येथे जैविक, रासायनिक तपासणी पावसाळ्यापुर्वी मार्च ते मे आणि पावसाळ्यानंतर नोव्हेबर ते मार्चपर्यंत तपासणी केली जाते.या तपासणीत जैविक व रासायनिक तपासणी केली जाते. त्या दरम्यान जैविक तपासणी तीन हजार ४१ करण्यात आली असता ३१६ दुषित नमुने आढळुन आले व रासायनिक तपासणीत नोव्हेबर ते मार्च दरम्यान एक हजार ४७७ नमुने घेवुन तपासणी करण्यात आली असता ३४४ नमुने दुषित निघाले. हे नमुने कोणत्या गटात मोडतात ही माहीती देण्याचे काम भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आहे. यात १० प्रकारची तपासणी केली जाते. त्यामुळे ३४४ रासायनिक नमुने कोणते ही माहीती उपविभागीय पाणी तपासणी प्रयोग शाळेकडेच नसल्याचे समोर आले आहे.जैविक तपासणीत क्लोराईड केल्यास पाणी पिणे योग्य करता येते. पण रासायनिक स्त्रोतात पाणी पिणे योग्य राहत नाही. रासायनिक तपासणी पी एच (अल्कली, आम्ल), टि डी एस( एकुण विरघळलेले क्षार), गढुळपणा, अल्क्यांनी निट्टी, फ्लोराईड, हार्डनेस, क्लोराईड(खारटपणा), नाईटेड, आयरण, सल्फेट या तपासणी रासायनिक तपासणीत येतात नमुने कोणते आहेत ही माहीती उपविभागीय पाणी तपासणी अधिकारी देतात. यामुळे ही माहीती सामान्य जनतेला माहीती होत नाही. तहान भागविण्यासाठी व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्रास याच पाण्याचा वापर केला जातो. तालुक्यातील पिंडकेपार (कन्हारटोला) येथे फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर होत असल्याने लहान, वयस्क, म्हातारे यांचे दात, हाडे ढिसुळ झाल्याचे प्रकार पुढे आले पण पाणी पुरवठा योग्य रितीने होत नसल्याने अनेकांना याच पाण्यावर अवलंबुन राहावे लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विधन विहीर साहीत्य पंचायत समितीला उपलब्ध नसल्याने अनेक गावात विधन विहीरी नादुरुस्त पडुन असल्याने पाणी टंचाई प्रश्न भेडसावत आहे.