प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहून संगठन मजबुत करावे-राजेंद्र जैन यांचे आवाहन

0
8
गोंदिया,दि.03 : पक्षाचे संगठन हे आवश्यक असून प्रत्येक बूथवर पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता राहणे आवश्यक आहे. त्याशिवाय पक्ष यश संपादन करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जागरुक राहून गावातील बूथ निहाय क्रियाशील व पक्ष संघटनेसाठी वेळ देणाèया कार्यकर्त्यांची निवड करणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने सर्र्वांनी प्रयत्न करून गावातील प्रत्येक बूथवर जाऊन समित्या स्थापन करावे असे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.ते सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते. गोंदिया येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. या सभेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील येणाèया गावातील बूथ समिती स्थापन करण्याबाबद चर्चा करण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजेंद्र जैन होते. याप्रसंगी जि.प. पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष किशोर तरोणे यांनीही सभेला मार्गदर्शन केले. सभेला जि.प. सदस्य रमेश चुèहे, कृउबास संचालक हिरालाल चव्हाण, विद्यार्थी राष्टदृवादी काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर, नामदेव डोंगरवार, प्रभू लोहिया, नरेश भेंडारकर, पुष्पमाला बडोले, पं.स. सदस्य सुधाकर पंधरे, सुधीर साधवानी, जर्नादन काळसर्पे, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, नगरपंचायत सदस्य देवचंद तरोणे, डॉ. रुखीराम वाढई, दिनेश कोरे, केदारनाथ चव्हाण, शिवाजी गहाणे, उदय काळे, रतीराम राणे, अश्विन नाकाडे, परसराम राऊत, भुमेश्वर लंजे, रुपविलास कुरसुंगे, सोहन चौधरी, भोलानाथ कापगते, आस्तिक परशुरामकर, ईश्वर कोरे, प्रशांत बडोले, एफ.आर.टी. शाह, शेरू पठान, भय्यालाल पुस्तोडे, लक्ष्मण लंजे, सुभाष कापगते, यादवराव तरोणे, श्रावण मेंढे, बाबुलाल भैसारे, अजय पाऊलझगडे, निलकंठ पुस्तोडे याशिवाय असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत मतदार संघातील बूथ निहाय कार्यकत्र्यांचे म्हणने एकूण घेण्यात आले.