घोडाझरी नवीन अभयारण्य; राज्यातील 55 वे अभयारण्य

0
31

चंद्रपूर,दि.04- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामधील घोडाझरी जंगल आता अभयारण्य म्हणून ओळखले जाणार असून तशी अधिसूचना काढली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घोडाझरी या नवीन अभयारण्याला मान्यता दिली होती. शासनाने अधिसूचना काढून त्यावर शिक्कामोर्बत केले आहे. पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा घोडाझरी हा महत्त्वाचा कॉरिडोर आहे. घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारे आहे. नागपूरपासून 103 किमी अंतरावर घोडाझरी अभयारण्या आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह 54 अभयारण्य असून राज्यातील घोडाझरी हे 55 वे अभयारण्य ठरणार आहे. 159.58 चौ. किमीचे ब्रह्मपुरी वनविभागातील नवे अभयारण्य अस्तित्वात आले आहे. या अभयारण्याच्या रूपाने इको टुरिझमला बुस्ट मिळणार आहे.

एकाच दिवशी होणाऱ्या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्ष्यांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येईल. या अभयारण्यात नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमिनीचे व घोडाझरी तलावालगतचे वन क्षेत्र आहे. घोडाझरी अभयारण्य व्हावे यासाठी आमदार बंटी भांगडीया यांनी विशेष प्रयत्न केले.