तिगाव पीएचसीत एरीअस घोटाळा

0
18

आमगाव,दि.05-तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या आरोग्य कर्मचार्याच्या एरीअस रकमेचा अपहार झाल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना झाल्याने खळबळ उडाली आहे. तिगाव प्राथमक आरोग्य केंद्रातील तत्कालीन कनिष्ठ सहाय्यत इखार यांने तेथील पाच ते सहा कर्मचार्याच्या एरीअसच्या रक्कमेत तफावत करुन हेराफेरी केल्याचे फेबुवारी महिन्या दरम्यान जेव्हा संबधित कर्मचारी आयकररिटर्न भरण्यासाठी जुळवाजुळव करु लागले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्या कर्मचार्याची लेखी तक्रार स्थानिक आरोग्य वैद्यकिय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पिडीत कर्मचार्यांनी केली. त्या तक्रारीच्या आधारे स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सदर प्रकरणाबाबत माहिती दिली.तेव्हापासून हे प्रकरण जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात चर्चेत आले असून सदर कर्मचारी हा सध्या जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहे.त्यातही सदर कर्मचारी मुख्यालयातही हजर राहत नसल्याची चर्चा आहे.या कर्मेचाèङ्माने ज्या कर्मचाèङ्मांच्या नावे एरीयसची रक्कम उचल केली ती रक्कम ८० ते ९० हजाराच्या दरम्यानची आहे.जेव्हा की संबधित कर्मचार्याच्यां हातात मात्र ८ ते १० हजार रुपयेच पडल्याचे समोर आले.जेव्हा आर्थिक ताळमेळ बसविण्ङ्माची वेळ आली तेव्हा  त्या कर्मचाèङ्मांने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले असून हा आकडा सुमारे ५ लाखाच्या वरील असल्याचे बोलले जात आहे.