सलमानची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात, आजची रात्र तुरुगांतच

0
10

जोधपूर(वृत्तसंस्था) दि.५– काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी सलमान खानला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. सलमानच्या वकीलांनी सेशन्स कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे, मात्र आजची रात्र त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. सेशन्स कोर्टाने आज सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सलमानाला साधारण 2.30 ते 3 वाजता दरम्यान मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. याच तुरुंगात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी आसाराम आहेत.

जामीनावर सुनावणी शुक्रवारी
– सीजेएम कोर्टाने सलमानला 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या वकीलांनी सेशन्स कोर्टात जामीनासाठी अर्ज केला. सेशन्स कोर्टाने तत्काळ सुनावणीस नकार देऊन उद्या, शुक्रवारी सुनावणी होईल असे म्हटले. त्यामुळे गुरुवारची रात्र सलमानला तुरुंगात काढावी लागणार आहे.सलमान खानचे मेडिकल केल्यानंतर त्याला जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात नेण्यात आले. याच तुरुंगात अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम देखील आहे.सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई देखील याच तुरुंगात आहे.त्यामुळे तुरुंगात सलमानच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती आहे. मागीलवेळी शिक्षा झाली तेव्हा सलमान 6 दिवस तुरुंगात होता. तेव्हा बॅरेक क्रमांक एकमध्ये कैदी नं. 343 होता.