इसापुर धरणाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे त्वरीत नदी-नाल्यात सोडा-देवसरकर

0
21
नांदेड,दि.8ः-जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सध्या पाणी टंचाईचे चित्र तिव्र होत असुन नागरिकांसह जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.पाण्याअभावी नागरीकांचे व जनावरांचे प्रंचड हाल होत असल्याने इसापुर धरनाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे कयाधु नदी, व  नाल्याना सोडून पाणी प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष कृषिनिष्ठ शेतकरी भागवत देवसरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या तापमानमध्ये प्रंचड वाढ झाल्यामुळे नदी,बोरवेअल,विहीर यांच्यातील पाणीसाठा वेगाने आटत चालले आहे.पाणी टंचाईमुळे नागरिकांना व जनावराना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इसापुर धरणाचे पाणी हदगाव तालुक्यातील धोतरा,रावनगाव,धानोरा,वाळकी,शिवनी,वाळकी,आष्टी,कोपरा,लिगांपुर वटफळी,कामारी,विरसनी,दिघी या गावाच्या परिसरातील नदी,नाल्याना सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.सध्या इसापुर धरणातून कालव्याद्वारे जिल्ह्यातील अर्धापुर,मुदखेड, ईतर तालुक्यातील नदी,नाल्याना सोडले जात आहे.त्याच धर्तीवर हदगाव तालुक्यातील सर्व नदी व नाल्याना उजव्या कालव्याद्वारे त्वरित पाणी सोडावे अशी मागणी देवसरकर यांनी केली आहे.