राष्ट्रसंताच्या विचाराचे वारसदार लक्ष्मणदादा नारखेडेंचे निधन

0
11

ब्रम्हपुरी,दि.08ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार वारसदार तुकारामदादा गीताचार्यांनी निर्माण केलेल्या कार्याचे उत्तराधीकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांचे श्रीगुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडी ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर येथे वृध्दपकाळाने आज दि. 8 एप्रिलला दुपारी दोन वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या 9 एप्रिलला दुपारी 12 वाजता अड्याळ टेकडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बु़ल़डाणा जिल्ह्यातील नांदुरा/खामगाव हे त्यांचे जन्मगाव असून तरूण वयातच राष्ट्रसंत तुकडोजी महराजांच्या विचारानी त्यांना आकर्षीत केले होते.श्रीगुरूदेव सेवामंडळाचे प्रचारक म्हणून त्यांचे श्रीगुरूदेव चळवळीत मोठे योगदान आहे.तुकारामदादा गीताचार्यांच्या सोबत त्यांचे कार्य सुरू होते. दादांनी अड्या्ळ टेकडीवर सुरू केलेल्या भुवैंकुंठाच्या प्रयोगात कुंटुबाची जवाबदारी संपल्यावर आपली संपत्ती समर्पीत करून पूर्णवेळ सहभागी झाले.तुकारामदादांचे कार्य उत्तराधीकारी म्हणून ते कार्यरत होते.