मोदीच आत्महत्येस जबाबदार,शेतकर्यांने लिहिली चिठ्ठी

0
8

यवतमाळ,दि.10(विशेष प्रतिनिधी)ः- जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याीतील राजूरवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी शंकर भाऊराव चायरे (वय 55) यांनी आज  मंगळवारला किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली.आत्महत्येपुर्वी शंकर चायरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्यास मोदीच जबाबदार असल्याचे लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान घाटंजी पोलीस ठाण्यात मृत शेतकरी शंकर चायरे यांची मोठी मुलगी जयश्री चायरे हिने तक्रार दाखल केली आहे. पावसाअभावी व किडीमुळे शेतात पीक येत नसल्याने आर्थिक अडचणीत होते.त्यातच यावर्षी बोण्ड अळीने कापसाचे पीक उध्वस्त झाले. दुष्काळ जाहीर झाला पण मदत मिळाली नसल्याने त्यानी आज कंटाळून आधी झाडाला फाशी घेतली. पण दोरी तुटल्याने एन्ड्रीन(किटकनाशक) घेऊन आत्महत्या केली.येथील शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात मृतदेह आणण्यात आला असून शासनातील जबाबदार व्यक्ती आल्याशिवाय मृतदेह न उचलण्याचा निर्णय त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे. यवतमाळ जिल्हा न्यायहक्क समितीचे देवानंद पवार आपल्या सहकारीसह घटनास्थळी पोचले असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.