मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

लाखनीच्या लिटिल प्लावर शाळेत बाबासाहेबांची जयंती उत्साहात

लाखनी,दि.14ः-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ, प्राध्यापक, विचारवंत, तत्वज्ञ, महान समाज सुधारक होते. खरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जोपासन्याचे काम आपन सर्व करुया असे प्रतिपादन लिटिल फ्लावर शाळेच्या प्राचार्या आशा वनवे यांनी केले. लिटील फ्लावर शाळा लाखनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत वाघाये, वक्ते म्हणून विशाल हटवार होते. प्राचार्य वनवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. संगीत शिक्षक आकाश भैसारे, सहा. शिक्षक विद्या फरांडे यांनी सुंदर गीत यावेळी सादर केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिक्षा बंसोड, अलका खटके, दामोधर गिरेपुंजे, कृष्णा उइके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पंचबुद्धे तर आभार प्रदर्शन अनमोल भोयर यांनी केले.

Share