प्रविण तोगडियांचा विहिंपला रामराम!विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी कोकजे

0
7

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.14- विश्व हिंदू परिषद (विहिंप) चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगड़िया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. शनिवारी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडिया गटाच्या राघव रेड्डी यांना विष्णु सदाशिव कोकजे यांनी पराभवाची धूळ चारली आहे. कोकजे विहिंपचे नवे कार्यकारी अध्यक्ष झाल्याने प्रविण तोगडिया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. मी विहिंपमध्ये होतो आता नाही अशी घोषणा त्यांनी केली.दरम्यान, प्रविण तोगडिया यांनी विहिंपला रामराम केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तोगडिया आगामी काळात काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.

विहिंपच्या 52 वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली. प्रविण तोगडिया यांनी गेल्या काही दिवसापासून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. सोबतच ते राम मंदिर, कश्मिरी हिंदू, रोजगार आणि शेतक-यांचे मुद्दे यावरून मोदी सरकारला दुषणे देत होते. त्यामुळे मोदी सरकारसह संघ परिवार तोगडियांच्या भूमिकेवर नाराज होता. त्यामुळे संघ परिवाराने तोगडियांची उचलबांगडी करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, तोगडिया याला विरोध करत होते. अखेर आज विहिंपच्या 52 वर्षाच्या इतिहासात कार्यकारी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली त्यात तोगडिया गटाचे राघव रेड्डी यांचा कोकजे यांनी पराभव केला. संपूर्ण संघ परिवार व मोदी विरोधात गेल्याने तोगडियांचे राज खालसा झाल्याचे मानले जात आहे. तसेच तोगडियांना मोदीविरोध नडल्याचे स्पष्ट झाले आहे.