गडचिरोली जिल्ह्यातील अपघातात 4 विद्यार्थी ठार

0
18

गडचिरोली,दि.16;-गडचिरेली येथील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत.मृतामध्ये एक वाहनचालक व चार विद्यार्थी आहेत. दोघे गोंदियाचे व प्रत्येकी एक जण बल्लारशहा व भामरागडचा असल्याची माहिती आहे. एमएच ४०-ए सीओ ३३५ क्रमांकाचे टाटा सफारी हे वाहन आरमोरीवरुन गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, चुरमुरा गावानजीक पोहचताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला टाटा सफारी वाहनाने जोरदार धडक दिली. यात ५ जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जुनेद कादरी(३३), आकाश तडवी(२२) व शुभम मगरे(२२) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले आहे. ठार झालेले विद्यार्थी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आरमोरीच्या पोलिस उपनिरीक्षक राणे घटनेचा तपास करीत आहेत.या भीषण अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.