मुख्य बातम्या:

एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पटोलेंसह दिलीप बनसोड यांची भेट

गोंदिया/गडचिरोली, दि.१६: मागील सहा दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड,जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर ,जि.प.सदस्य किशोर तरोणे,भाकपचे राज्य कार्य.सदस्य हौसलाल रहागंडाले,माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट करुन देण्यासोबतच मुख्यमंत्र्यापर्यंत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोचविण्याचे आश्वासन दिले.तसेच आपला नेहमीच पाठिंबा राहिल असे आश्वासन दिले.तर गडचिरोली येथील आंदोलनाला माजी खासदार नाना पटोले यांनी भेट देऊन  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विधिमंडळ व न्यायालयीन लढाईद्वारे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन श्री.पटोले यांनी दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे सर्वजण जिल्हा परिषदेपुढे मंडप घालून बसत आहेत.गडचिरोलीतील आंदोलनाला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनीही भेट दिली. तर गोंदियातील आंदोलनात हौसलाल रहागंडाले यांनी नाशिक ते मुबंई च्या 180 किमी शेतकर्यांच्या पायदळ आंदोलनाने सरकारला झुकावे लागले तसेच आपल्या आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल असे विचार व्यक्त केले.गंगाधर परशुरामकर यांनी या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प पडली आहे तरी सरकारला काहीही देणघेण दिसत नाही.परंतु आपण सुरु केलेले आंदोलन न्यायमागण्यासाठी असल्याने आमचा पाठिंबा अससल्याचे सांगितले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे यांनी उद्या होऊ घातलेल्या अर्थमंत्री व आरोग्यमंत्र्याच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे सांगितले.आंदोलनात जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ६९१ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी-कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, अर्चना वानखेडे, संकेत मोरघरे, संजय दोनोडे, सपना खंडाईत, डॉ. मीना वट्टी, सारनाथ बोरकर, अजित सिंग, ग्रीस्मा वाहने, प्रतिमा मेश्राम, संजय मेंढे, अ‍ॅड. रेखा कानतोडे, प्रणीता भोयर, ठनेंद्रसिंग येडे, संतोष डिब्बे, अर्चना चौधरी, राखी प्रसाद, रेखा पुराम, अर्चना कांबळे, प्रदीप रहांगडाले, ललीता गौतम, उषा जगताप, निशांत बन्सोड, अनिरूध्द शर्मा, अनिल रहमतकर, प्रकाश थोरात, पंकज रहांगडाले, निश माखीजा, मनिष मदने, सतीश माटे, मनोज सातपुते, अविनाश व्हराडे, विद्या रहांगडाले, माया नागपुरे, हर्षल अंबुले, गुणवंता कटरे यांचा समावेश आहे.

Share