मुख्य बातम्या:

बिलोली तालुका काँग्रेस बुथ कमिटी समन्वयकपदी प्रा.शिवाजी पाटील

बिलोली,दि.१९ : आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेस पक्षाच्या वतीने बुथ कमिट्या गठित करण्यासाठी तालुका निहाय विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून बिलोली तालुका समन्वयक पदी प्रा.शिवाजी पाटील पाचपिपळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनेक वर्षापासुन काँग्रेस पक्षात एकनिष्टतेने कार्य करीत आसताना पक्ष संघटन व त्यांच्या विविध सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेउन काँग्रेस कमिटिने त्यांची बिलोली तालुका बुथ कमिटिच्या समन्वयक पदी निवड जाहिर केली.या निवडी बद्दल आ.डि.पी.सावंत,आ.वसंतराव चव्हाण आ.अमर राजुरकर,आ.रावसाहेब अंतापुरकर ,जिल्हाअध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,लोहगाव सर्कल  जि.प.सदस्य संजय बेळगे ,सगरोळी जि.प.सदस्या सुंदरबाई पाटिल मरखले ,श्रीकांत गुंजकर, गणेश पाटिल,भिमराव जेठे ,शंकर व्यंकम,दिलीप पा.पांढरे ,संतोष कुलकर्णी ,गंगाधर पा.भिंगे ,हाजपा पा.सुंकलोड,दतु कोटनोड,संतोष भक्तापूरे , पांडुरंग पा.रामपुरे,संदिप जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Share