दोन लाखाच्या विद्युतीकरणानंतरही व्यवस्था जैसे थे

0
12
गोंदिया,दि.२१ : स्वच्छता व उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे जिल्हा परिषदेलाआयएसओ मानांकन प्राप्त झाले. मात्र,जिल्हा परिषदेची सध्यास्थितीत कार्यप्रणाली तसेच स्वच्छता व्यवस्थाही कोलमडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या प्रवेश द्वारासमोर असलेली अस्वच्छता तसेच तुटलेल्या विद्युत तारा,लाईट, याशिवाय तिथे असलेल्या कक्षासमोर अस्ताव्यस्त स्थितीत बसत असलेले कर्मचारी यावरुन अस्वच्छता व्यवस्थापनाचा प्रत्यय येत आहे. जिल्हा परिषदेने सन २०१०-११ मध्ये उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेच्या बळावर आयएसओचे प्रमाणपत्र प्राप्त केले.त्यातच विद्युतीकरणाच्या नावावर गेल्या काही दिवसापुर्वीच २ लाख ७० हजार रुपये एका विशेष कंत्राटदाराला हाताशी धरुन खर्च करण्यात आले.महिना लोटत नाही तोच मुख्य द्वारातील पोर्चमधील ट्युबलाईट निघू लागले आहेत. दरम्यान, सर्व व्यवस्थापनदेखील सुव्यवस्थित होते. मात्र, गेल्या ५ वर्षांतजिल्हा परिषदेच्या प्रशासनावर कसलेही नियंत्रण नसल्याने व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजत आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषद परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे, असा आरोप जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी केला आहे. अस्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद इमारतीच्या भिंती थुंकीने रंगलेल्या आहेत. भिंतींवर संतांचे छायाचित्र असले तरी त्या चित्रांच्या परिसरात अस्वच्छता असल्यामुळे एकप्रकारे संतांची अवमाननाच होत आहे.जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येणाछया नागरिकांना म्हणजेच ग्राहकांना बसण्याची सुव्यवस्थित व्यवस्था नाही.अस्तव्यस्त पद्धतीने बसून नागरिकांना आसरा घ्यावा लागतो. शिवाय अधिकाछयांच्या कक्षासमोरच अस्वच्छता
दिसून येते. स्वच्छतागृहांची तर दुरवस्थाच आहे. अलीकडे केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेचा धडा देत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे.म्हणजेच, स्वच्छतेचा संदेश देणारी ही संस्था ‘दिव्याखाली अंधारङ्क या म्हणीप्रमाणे अस्वच्छतेवर अव्यवस्थापनाचा परिचय देत आहे, असाही आरोप त्यांनी केला.