भारतीय कबड्डी संघात निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
10

गडचिरोली,दि.23ःजिल्ह्यातील भामरागड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १0 व्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सिंधू कुरसामी व जयश्री वड्डे या दोन मुलींची कॅनडा येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी भारतीय कबड्डी संघात निवड झालेल्या मुलींचा काल आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी सत्कार करण्यत आला.
काल अहेरी येते आयोजित भाजपा अहेरी तालुका बुथ प्रमुखाच्या बैठकीत आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सिंधू कुरसामी व जयश्री वड्डे दोन मुलींचा शाल, श्रीफळ, ट्रॅक सूट व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थिंनींना सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री ना. आत्राम यांनी यावेळी दिली. तसेच त्या मुलींचे पालक, कस्तुरबा बालिका विद्यालय भामरागड च्या मुख्याध्यापिका मुडपल्लीवार व क्रीडा शिक्षिका यांच्याही यांच्याही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.